महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा : कुटुंबावर सशस्त्र हल्ला; आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी पीडितांकडून अमरण उपोषणाचा इशारा - बुलडाणा जिल्हा न्यूज अपडेट

संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात एका कुटुंबावर जुन्या वादातून दहा ते बारा जणांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेला 15 दिवस उलटून देखील अद्यापही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप संबंधित कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्यास येत्या 29 तारखेपासून अमरण उपोषणाचा इशारा या कुटुंबाच्या वतीने देण्यात आला आहे.

कुटुंबावर सशस्त्र हल्ला
कुटुंबावर सशस्त्र हल्ला

By

Published : Jun 22, 2021, 8:57 PM IST

बुलडाणा -संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात एका कुटुंबावर जुन्या वादातून दहा ते बारा जणांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेला 15 दिवस उलटून देखील अद्यापही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप संबंधित कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी आरोपीवर कारवाई न केल्यास येत्या 29 तारखेपासून अमरण उपोषणाचा इशारा या कुटुंबाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले आहे.

कुटुंबावर सशस्त्र हल्ला

कुटुंबाकडून अमरण उपोषणाचा इशारा

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भोन गावतील महादेव इंगळे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जुन्या वादातून 9 जूनच्या रात्री दहा ते बारा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे कुटुंबीय जखमी झाले. याबाबत पीडित कुटुंबाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली. मात्र घटनेला 15 दिवस उलटून देखील पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास येत्या 29 जूनपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले आहे.

हेही वाचा -Nagpur Murder Mystery : हत्या करण्यापूर्वी आरोपीने केला मेव्हणीवर अत्याचार?

ABOUT THE AUTHOR

...view details