बुलडाणा - कोरोनाची रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनाने ब्रेक द कोरोना चैन मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत 21 जुलैपर्यंत दुपारी 3 नंतर लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात बाहेर फिरणाऱ्यांकरता बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी ऑल आऊट ऑपरेशन सुरू केले आहे. ते स्वतः थेट रस्त्यावर उतरुन संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करत आहेत.
घराबाहेर पडताना मास्क परिधान न करणारे, सार्वजनिक जागी थुंकणारे, डबल सिट दुचाकी चालवणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश असून 7 ते 21 जूलै पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असल्याने कठोर पावले प्रशासनाकडून उचलण्यात आली आहेत. असे असताना ही दुपारी 3 नंतर काहीजण रस्त्यावर फिरत अससल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर प्रत्येक चौकात ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिसांची चोख नाकाबंदी सुरू केली आहे.