बुलडाणा- बुलडाणा विधानसभा मतदार संघात भाजप-सेनेच्या महायुती सोबत बंडखोरी करत भाजपचे योगेंद्र गोडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांच्या प्रचार बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे फोटो आहेत. 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' हा नाराही बॅनरवर लावण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.
बुलडाण्यात अप्रत्यक्ष भाजपची बंडखोरांना साथ ?
बुलडाण्यात खरंच भाजप-शिवसेना युती धर्म पाळला जात आहे का? की बंडखोर उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा भाजपकडून यावर 'ब्र' शब्दही काढला न गेल्याने बुलडाणा मतदार संघाचे मतदार संभ्रमात असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.
हेही वाचा-देशाला जाती-धर्माच्या नावाखाली तोडणाऱ्या मानसिकतेविरुद्ध भाजपचा संघर्ष- स्मृती इराणी
बुलडाण्यात खरंच भाजप-शिवसेना युती धर्म पाळला जात आहे का? की बंडखोर उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा भाजपकडून यावर 'ब्र' शब्दही काढला न गेल्याने बुलडाणा मतदार संघाचे मतदार संभ्रमात असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.
बुलडाणा मतदार संघात महायुतीचे, शिवसेनेचे संजय गायकवाड हे अधिकृत उमेदवार आहेत. तर गेल्या पंचवार्षिकला भाजपचे उमेदवार असलेले योगेंद्र गोडे हे यावर्षी देखील इच्छुक उमेदवार होते. मात्र, त्यांची उमेदवारी रद्द झाल्याने गोडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या प्रचार बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचे फोटो असलेले बॅनर बुलडाणा मतदार संघातील मोताळा शहरात लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.