बुलडाणा - खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात संत गजानन महाराज संस्थानच्या नावावर बुंदीचे लाडू वाटप करुन मत मागत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारदेखील केली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी पाच व्यक्तींना लाडूसह ताब्यात घेतले आहे.
खामगाव भाजप शहर अध्यक्ष संजय शिंगारे यांची प्रतिक्रिया हेही वाचा- संजय राऊतांना डच्चू; सेनेच्या 'या' अधिकृत यादीतून नाव वगळले
याप्रकरणी अटक केलेले काहीजण हे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कॉलेज मधील कर्मचारी असल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष संजय शिंगारे यांनी केला आहे. मात्र, हे सर्व लोक खरच गजानन महाराज संस्थानच्या सांगण्यावरून लाडू वाटप करत होते का? ते काँग्रेस कार्यकर्ता आहेत की भाविक? याचा याचा पोलीस तपास करत आहेत. तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी लाडू फोडून बघितले असता, त्यामध्ये संशयास्पद काहीच आढळून आले नाही.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; सुमोटो दाखल