बुलडाणा- भारतीय जनता पक्षामुळे आज भारत देश हा आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे येथील जनता भाजपला कधी माफ करणार नाही, अशी माफक टिका वंचित बहुजन आघाडी प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे युवक मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
भाजपमुळे देश आर्थिक संकटात - सुजात आंबेडकर
जामोद मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी उमेदवार संगीतराव भोंगळ यांच्या प्रचारासाठी योग मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सुजात आंबेडकर
हेही वाचा-शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर
जामोद मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी उमेदवार संगीतराव भोंगळ यांच्या प्रचारासाठी योग मेळावा आयोजित करण्यात आला होता. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात तीन पंचवार्षिक आमदार म्हणून राहिलेले संजय कुटे यांच्या होमटाऊन मध्ये हा मेळावा पार पडला. आरएसएस प्रणित भाजप सरकार मुळे हा देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या सरकारला या निवडणुकीमध्ये मतदान करू नका, असे आवाहन सुजात यांनी केले.