बुलडाणा - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरशः थट्टा लावली असून अद्यापपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झालेली नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जाणार आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना पिठलं भाकर देऊन भाजपकडून आज शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे. तर सरकारने तत्काळ हेक्टरी कमीत-कमी 25 ते जास्तीत जास्त 50 हजार रुपयांची भरीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आली आहे.
बुलडाणा भाजप पिठलं-भाकर आंदोलन हेही वाचा -'किरीट सोमैया यांच्या डोक्यावर कायमस्वरुपी परिणाम झाला आहे'
यंदा शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी
या वर्षाची दिवाळी ही शेतकऱ्यांकरिता काळी दिवाळी आहे. सर्वच पिके हातची निघून गेली. त्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे दुष्काळाच्या खाईत उभा आहे. अशावेळी बुलडाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये आणि वारी जास्त दाखवल्यामुळे पिक विमा योजना व शास्त्राच्या विविध मदतीपासून या भागातील शेतकरी वंचित राहिला आहे यासाठी शासून जागे व्हावे आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यात झुणका-भाकर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी, आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी झुणका भाकराची शिदोरी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर सोडून जेवण केले यावेळी शासनाविरुद्ध प्रचंड घोषणा देण्यात आल्या. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार हे बिघाडी सरकार असल्याचे सांगत सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पिठलं-भाकर खाऊन आंदोलन केले आहे.
पालकमंत्री डॉ. शिंगणेंच्या सिंदखेडराजा मतदारसंघाला सर्वाधिक निधी
या वेळी शासनाकडून मिळालेल्या 47 कोटींच्या मदत निधीत सर्वात जास्त मदत जिल्ह्याच्या पालकमंत्री डॉ. शिंगणेंच्या मतदार संघ सिंदखेडराजा या भागात मिळाल्याने प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी डॉ. शिगणेंचा समाचार घेतला. ते म्हणाले की, सिंदखेडराजा मतदार संघातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त निधी मिळाला म्हणून आम्हाला आनंदच आहे त्याच्यात दुःख होण्याचे कारण नाही. आम्हालाही आनंदच आहे. तेही शेतकरी आहेत. पण बाकीच्या 12 तालुक्यातही शेतकरीच राहतात ना, असे सांगत कुटे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचा समाचार घेतला. खासदार जेव्हा-तेव्हा आपल्या मेहकरमध्येच राहतात, असेही ते म्हणाले. यामुळे अशा भेदभावामुळे निश्चितच शेतकरी यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा -आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक, मोझरीतील आंदोलनाला हिंसक वळण