बुलडाणा - महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा, महिलांच्या समर्थनात कडक कायदे करा यासह विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या 13 ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात तेरा ठिकाणी भाजपचे धरणे आंदोलन... - बुलडाणा जिल्ह्यात तेरा ठिकाणी भाजपचे धरणे आंदोलन.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बुलडाण्यात विविध मागण्यांसाठी भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर तहसील ठिकाणी शासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
![राज्य सरकारच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात तेरा ठिकाणी भाजपचे धरणे आंदोलन... bjp-agitation-at-buldana-district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6203259-thumbnail-3x2-oo.jpg)
बुलडाणा जिल्ह्यात तेरा ठिकाणी भाजपचे धरणे आंदोलन...
बुलडाणा जिल्ह्यात तेरा ठिकाणी भाजपचे धरणे आंदोलन...
यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्याची कर्ज माफी न करता उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती करू असे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे व राज्यातील महिला मुलींवरील अत्याचारासंदर्भात कडक कारवाई होण्यासाठी कठोर कायदे आणावेत, यासह विविध मागण्यांसाठी भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर तहसील ठिकाणी शासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.