बुलढाणा:वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी आयोजित आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व बेरोजगार युवक बहुसंख्येने सहभागी झाले होते. सुशिक्षित वर्गाला रोजगारासाठी मुख्य ठिकाणी भूखंड द्यावे, बेरोजगारांच्या कुटुंबातील किमान एकाला महामंडळातर्फे प्रशिक्षण व कर्ज द्यावे, बेरोजगारांच्या बँकमधील प्रलंबित कर्ज प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी प्रयोजनाकरिता असलेल्या सरकारी जागांचे भूखंडचे कायम पट्टे करून द्यावे, आर्थिक मागासलेल्या जातीसमूहातील कुटुंबांना घरकूल बांधून द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची राज्यात चर्चा: बिरबलची खिचडी या आंदोलनाची संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात आज चर्चा होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे करण्यात आलेले बिरबलची खिचडी आंदोलन हटके आणि लक्षवेधी ठरले. आंदोलनाने दररोज राजकारणींचे एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोपला उघडे पाडले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे हे आंदोलन करण्यात आले.