बुलडाणा : भरधाव वेगात असलेल्या कारचे अचानक टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन कारचा अपघात (Accident due to car tire burst) झाला. यामध्ये कार समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली (car collides with two wheeler). या अपघातात दुजाकीवरील एक जण ठार (Bike rider dies in collision with uncontrolled car) तर एक जखमी झाल्याची घटना बुलडाणा नजिक असलेल्या राजूर घाटात दुपारच्या सुमारास घडली आहे. latest news from Buldana, Buldana crime
Car And Bike Accident : अनियंत्रित कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू - कारची दुचाकीला धडक
भरधाव कारचे टायर फुटल्याने (Accident due to car tire burst) झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही कार अनियंत्रित होऊन दुचाकीवर समोरासमोर (car collides with two wheeler) धडकली. अपघातात अशोक मक यांचा जागीच मृत्यू (Bike rider dies in collision with uncontrolled car) झाला तर त्यांचा मुलगा सचिन जखमी झालेला आहे. latest news from Buldana, Buldana crime
टायर फुटल्याने कार झाली अनियंत्रित :मोताळा तालुक्यातील मूर्ती येथील ५५ वर्षीय अशोक सखाराम मक हे बुलडाण्यात डायलिसिस करण्यासाठी आपल्या मुलासह दुचाकीने येत असताना समोरून येणाऱ्या कारचे अचानक टायर फुटले आणि कार अनियंत्रित होऊन दुचाकीवर जाऊन धडकली.
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू : अपघातात अशोक मक यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा सचिन जखमी झालेला आहे. त्याच्यावर बुलडाणा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.