बुलडाणा - विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरुवात झालेली आहे. परंतु, खामगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या बेलुरा येथील गावकऱ्यांचा मतदानावरील बहिष्कार कायम आहे. प्रशासन येथील गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थ या भूमिकेवर कायम आहेत.
बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम; समजूत काढण्यात प्रशासन अपयशी - बुलडाणा विधानसभा मतदारसंघ
खामगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या बेलुरा येथील गावकऱ्यांचा मतदानावरील बहिष्कार कायम आहे. प्रशासन येथील गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थ या भूमिकेवर कायम आहेत.
![बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम; समजूत काढण्यात प्रशासन अपयशी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4822668-thumbnail-3x2-buldana.jpg)
बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम; गावात रस्ता नसल्याने भूमिकेवर ठाम
बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम; गावात रस्ता नसल्याने भूमिकेवर ठाम
खामगाव तालुक्यातील बेलुरा येथे रस्त्यासाठी मतदानावर सकाळपासून गावातील मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. तालुक्यातील खामगाव शहर वगळता इतर भागात मतदान अतिशय संथ गतीने सुरू असून, पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा मतदानावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.
बेरुरा या गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावात अजूनही रस्ता झालेला नसून इतर मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. या गावांमध्ये एकूण 300 नोंदणीकृत मतदार आहेत.