बुलडाणा -नव वर्षाच्या निमित्ताने प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंगळवारी सायंकाळपासूनच भाविक शेगावात दाखल झाले होते. नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येतात.
नव वर्षानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी - नविन वर्षाचे स्वागत बुलडाणा बातमी
भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानाच्या वतीने करण्यात आली होती. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी संतनगरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी माथा टेकला.
हेही वाचा-'आरे' प्रकरणी वादग्रस्त अधिकारी अश्विनी भिडे यांची प्रधान सचिव पदी बढती
भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानाच्या वतीने करण्यात आली होती. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी संतनगरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी माथा टेकला. भाविकांची मंदिरात पहाटेपासूनच गर्दी दिसून आली. सकाळी ५ वाजल्यापासून भाविक रांगेत दर्शनासाठी उभे होते. आज दिवसभर भाविकांची अशीच मांदियाळी राहणार आहे.