महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Murder In Buldhana औरंगाबदच्या महिलेचा सैलानीत निर्घृण खून, दहा वर्षापासून पायाच्या त्रासाने होत्या पीडित - बुलडाण्यात महिलेचा खून

औरंगाबाद येथील महिला मागील दहा वर्षापासून सैलानी ( Sailani Buldhana) येथे उपचारासाठी राहत होत्या. मात्र अज्ञात आरोपीने त्यांचा निर्घृण खून ( Woman Murder In Buldhana ) केला. या घटनेमुळे सैलानी परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात ( Raipur Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

Woman Murder In Buldhana
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Dec 15, 2022, 4:43 PM IST

बुलडाणा - पायाच्या दुखण्यामुळे सैलानी येथे राहणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील महिलेचा निर्घृण खून ( Aurangabad Women Murder In Buldhana ) करण्यात आला. लता मुरलीधर कोतकर असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री रायपूर पोलीस ठाण्यात ( Raipur Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा वर्षापासून सैलानी येथे राहत होती महिलाऔरंगाबाद येथील महिला ( वय 50 वर्ष ) यांना पायाचा त्रास होता. त्यामुळे त्या सैलानी येथे पायावर उपचार घेत होत्या. त्या मागील दहा वर्षापासून सैलानी येथेच राहत होत्या. मात्र दोन दिवसापूर्वी त्यांची बहीण त्यांच्या भेटीसाठी सैलानी येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्या सैलानी येथे आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी सगळीकडे शोध घेतला. तरीही त्या मिळून न आल्याने त्यांनी त्यांच्या मुलाला याबाबतची माहिती दिली.

असा झाला घटनेचा उलगडा त्यांच्या बहिणींने त्यांचा शोध घेतला असता, काही नागरिकांनी भडगाव शिवारात महिलेचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती त्यांना दिली. त्यांच्या माहितीवरुन त्यांच्या बहिणींने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका महिलेचा खून ( Aurangabad Women Murder In Buldhana ) केल्याचे दिसून आले. ही महिला त्याच असल्याचे त्यांच्या बहिणींनी ओळखले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती त्यांच्या मुलाला दिली.

मुलाने दाखल केली तक्रारघटनेची माहिती मिळताच त्यांचा सुलतानपूर जिल्हा औरंगाबाद येथे राहणारा मुलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याने आईचा अज्ञात आरोपीने खून ( Aurangabad Women Murder In Buldhana ) केल्याची तक्रार रायपूर पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीत त्याने मागील 10 वर्षापासून पायाचा त्रास असल्याने त्याची आई सैलानी येथे नेहमी दर्शनाकरिता येत होती. तेथेच राहत होती. त्यांची बहीण त्यांच्या आईला भेटण्यासाठी 2 दिवसांपूर्वी सैलानी येथे आली होती. परंतु तिची आई सोबत भेट झाली नाही. मात्र ती सैलानी येथे असताना तिला लोकांकडून भडगाव शिवाराच्या जंगलामध्ये त्याच्या आईचा मृतदेह पडलेले असल्याची माहिती दिल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात ( Raipur Police Station ) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details