बुलडाणा -जावयाचा घातपात करणाऱ्यांना अटक करून लोणारच्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी सासऱ्याने वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय बच्छीरे असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी वेळीच बच्छीरे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
लोणार येथील भीमनगरमधील रहिवाशी अमोल अशोक डोंगरे वय २९ वर्ष यांचा २४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन मटका चक्री जुगाराच्या व्यवसायामुळे घातपात झाल्याची तक्रार संजय बच्छीरे यांनी दिली आहे. संजय बच्छीरे हे मृत अशोक डोंगरे यांचे सासरे आहेत. मात्र पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असून, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बच्छीरे यांनी केला आहे. जावयाचा घातपात करणाऱ्यांना अटक करून लोणारच्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बच्छीरे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जावायाला वीस लाखांचा सट्टा लागल्याने घातपात