महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' एसटी कर्मचाऱ्यांची मृत्यूशी झुंज संपली - खांमगाव आगार

बुलडाणा जिल्ह्यातील खांमगाव आगारातील साहाय्यक मेकॅनिक पदावर कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांने मंगळवारी रात्री विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांना तात्काळ खांमगाव येथील सामान्य रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्या कर्मचाऱ्याचा आज (गुरूवार) मृत्यू झाला आहे.

विष पिवून करून आत्महत्येचा प्रयत्न
विष पिवून करून आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Nov 17, 2021, 11:47 AM IST

Updated : Nov 18, 2021, 12:25 PM IST

बुलडाणा - राज्यभरात सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या आंदोलनात (ST workers strike) सहभाग घेतलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील साहाय्यक मेकॅनिक पदावर (ST employees in Khamgaon) कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांने मंगळवारी रात्री विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला (Attempted suicide) होता . दरम्यान त्यांना तात्काळ खांमगाव (Khamgaon) येथील सामान्य रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारदरम्यान 'त्या' एसटी कर्मचाऱ्याची मृत्यूशी झुंज संपली. त्याचा आज (गुरूवारी) मृत्यू झाला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव विशाल प्रकाश अंबलकार (वय २९) असे असुन ते माटरगांव येथील रहिवासी होता.

खामगावात एसटी कर्मचाऱ्यांचा विष पिवून करून आत्महत्येचा प्रयत्न

निलंबन होतील या विवंचनेतून केला होता आत्महत्येचा प्रयत्न -

राज्यभर महाराष्ट्रात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी विविध मागण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यासह शांततेत आंदोलन सुरू केलेले आहे. परंतु या आंदोलनाची महाराष्ट्र शासनाने अद्यापही गंभीर दखल घेतली नाही व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही. उलट सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST workers) समतोल बिघडत चालला आहे. दरम्यान खांमगाव आगारातील साहाय्यक मला देखील निलंबित करण्यात येईल या विचारामुळे गेल्या दोन दिवसांपासून मेकॅनिक विशाल प्रकाश अंबलकार यांची मानसिक परिस्थिती बिघडत चालली होती. याच विवंचनेतून विशाल यांनी आपल्या घरी माटरगांव (Matargaon) येथे जावून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अशी माहिती सांगण्यात आली होती. आज उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि त्याचा मृत्यू झाला.

Last Updated : Nov 18, 2021, 12:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details