बुलडाणा - सोयाबीनला 8 हजार तर कापूसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे गेल्या तीन दिवसापांसून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन (Tupkar's agitation) सुरु आहे. याच आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले आहे. दरम्यान शुक्रवारी (काल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेख रफीक शेख करीम यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलन मंडपासमोरच स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु तेथे उपस्थित पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच आवरले. यावेळी कार्यकर्त्यांचा संयम सुटला. काही कार्यकर्त्यांनी येथील चिखली रोड बंद केला. रस्त्यावर बसून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली.
आत्मदहनाचा प्रयत्न करणारे शेख रफीक यांना पोलिसांनी घेवून गेल्यानंतर तेथे उपस्थित कार्यकर्ते संतप्त झाले होते. अशातच काही कायकर्ते बुलडाणा-चिखली मार्गावर जावून बसले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. कार्यकर्त्यांची भावना समजून तिन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत असलेले रविकांत तुपकर हे सुध्दा आंदोलन मंडपातून तेथे पोहचले. मात्र कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेत एका वाहनाखाली शिरण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ याठिकाणी गोंधळ उडालेला होता.
पोलिसांच्या वाहनावर दगडफेक