महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्या प्रशासक पदावरुन कृपलानी यांचे पायउतार - buldana breaking news

खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे मुख्य प्रशासक असलेले मलकापूर येथील सहायक निबंधक महेश कृपलानी यांचे मुख्य प्रशासक या पदावरुन पायउतार करण्यात आले आहे. याबाबत बुलडाणा जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी आदेश दिले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jun 16, 2021, 3:33 PM IST

Updated : Jun 16, 2021, 3:47 PM IST

बुलडाणा -खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे मुख्य प्रशासक असलेले मलकापूर येथील सहायक निबंधक महेश कृपलानी यांचे मुख्य प्रशासक या पदावरुन पायउतार करण्यात आले आहे. याबाबत बुलडाणा जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी आदेश दिले आहे. त्यांच्याविरोधात मागील अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या, त्या तक्रारींची दखल घेत त्यांनी हे आदेश दिले आहेत. त्यांच्या जागी बुलडाण्याचे विशेष लेखापरिक्षक दीपक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक जाधव यांनी खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकाचा पदभारही स्वीकारला आहे. दरम्यान, सहायक निबंधक महेश कृपलानी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून कृपलानी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी दिला आहे.

बोलताना जिल्हा उपनिबंधक

अशा प्रकारे करण्यात आली होती प्रशासकांची नियुक्ती

खामगाव बाजार समितीवर काँग्रेस-भारिप-बमसंची सत्ता होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर सभापती संतोष टाले यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्‍यामुळे राजकीय आरोप-प्रत्‍यारोप झाले होते. सत्ताधाऱ्यांविरुद्ध तक्रारीही झाल्या होत्‍या. त्‍यातच संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने दीड वर्षांपासून समितीवर प्रशासक नियुक्‍त आहेत. आधी मलकापूर येथील सहायक निबंधक महेश कृपलानी यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर बुलडाण्याचे विशेष लेखापरिक्षक दीपक जाधव यांची नियुक्‍ती झाली. जाधव यांच्‍या नियुक्‍तीवर भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी आक्षेप घेतल्याने पुन्‍हा महेश कृपलानींची नियुक्‍ती मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. कृपलानी 31 डिसेंबर, 2020 पूर्वीपासून प्रशासकाचा पदभार सांभाळत होते. दरम्यान, हा पदभार सांभाळताना कृषी उत्त्पन्न बाजार समितीत चालणाऱ्या कारभाराबाबत त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर सतत तक्रारी वाढत असल्याने त्यांना मुख्य प्रशासक पदावरून 8 जूनला बुलडाणा जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी आदेश काढत त्यांच्या जागी दीपक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम

मागील आठवड्यात खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या शेंगाचे भाव व्यापाऱ्यांनी पाडले होते. आपल्या भुईमुगाच्या शेंगाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक होऊन प्रशासक कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केले होते. तत्कालीन प्रशासक महेश कृपलानी यांच्या विरोधात वाढत असलेल्या तक्रारी आणि खांमगाव कृषी उपन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे कृपलानी यांचा पदभार काढण्याची ही कारवाई करण्यात आली.

तक्रारीबाबत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून कारवाई - जिल्हा उपनिबंधक

खांमगाव कृषी उपन्न बाजार समितीचा तत्कालीन प्रशासक असलेले मलकापूर येथील सहायक निबंधक महेश कृपलानी प्रशासकाचा पदभार सांभाळतांना कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये चालणाऱ्या कारभार संदर्भात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला कळविणार आहे. जे काही कायदेशीर कारवाई करता येईल ते करू, अशी प्रतिक्रिया बुलडाणा जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी दिली.

Last Updated : Jun 16, 2021, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details