महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणामध्ये बनावट एटीएमद्वारे लुबाडणारी टोळी गजाआड - शेगाव

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगावात सिद्धिविनायक लॉजवर छापा टाकून 1 लाख 33 हजार 215 रुपयांचा मुद्देमालासह 3 आरोपींना जेरबंद केले.

एटीएमद्वारे लुबाडणारी टोळी गजाआड

By

Published : Sep 11, 2019, 5:59 PM IST

बुलडाणा- लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने बँक एटीएम कार्डचा डेटा चोरून त्या आधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

बनावट एटीएमद्वारे लुबाडणारी टोळी गजाआड

हेही वाचा -बुलडाण्यात बँकेकडून कर्जसाठी शेतकऱ्यांची चेष्टा; शेतकऱ्यांनी इच्छामरणाची मागितली परवानगी

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगावात सिद्धिविनायक लॉजवर छापा टाकून 1 लाख 33 हजार 215 रुपयांचा मुद्देमालासह 3 आरोपींना जेरबंद केले. हरियाणा राज्यातील आरोपींचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये भवानी खेडा तालुक्यातील अनिल धर्मवीर (रोहनाथ), रोहित पृथ्वीसिंग (रोहछम) तसेच सतीश बियासिंग (पाही) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या खोलीची झडती घेण्यात आली त्यावेळी त्यांच्या ताब्यातून एचपी कंपनीचा लॅपटॉप, 1 मोठे तर 2 लहान स्कॅनर, लॅपटॉप चार्जर, डाटा केबल, 11 कोरे व्हीआयपी एटीएम, बनावट केलेले 6 एटीएम कार्ड, 4 मोबाइल व नगदी 15 हजार रुपये असा जवळपास 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा - जिजाऊंच्या जिल्ह्यातच महिला बचत गटाच्या मेळाव्यात रंगला चक्क लावणीचा फड..

पोलिसांनी खाक्या दाखल्यावर या तिन्ही आरोपींना गुन्ह्याची कबुली दिली. दिल्ली येथून विमानाने ते शिर्डी येथे येत आणि नंतर राज्यातील इतर शहरांमध्ये दाखल होऊन ज्यांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. त्यांना मदतीच्या बहाण्याने त्यांचे एटीएम स्कॅन मशिनीत टाकून डेटा चोरायचे. नंतर कोऱ्या एटीएममध्ये तो डेटा टाकून रात्रीच्या वेळी एटीएममधून पैसे काढायचे.

ही टोळी शेगावमध्ये आली होती. यामध्ये 2 टीममध्ये आरोपी होते. यातील एका टीममधील 3 आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. तर दुसऱ्या टीममधील दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक पोलिस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरिक्षक नागेश चतरकर, पोलीस उप निरिक्षक योगेश दंदे, अनिल भुसारी, विकास खानजोडे, रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक, पंकजकुमार मेहेर, श्रिकांत चिंचोले, उमेश बोरसे, अनिल बरींगे यांनी पार पाडली.

ABOUT THE AUTHOR

...view details