महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात आणखी एक रुग्ण 'कोरोना पॉझिटिव्ह' - जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा

बुलडाण्यात मंगळवारी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज (बुधवार) पुन्हा एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे 28 मार्च रोजी कोरोनाबाधित रुग्णाच्या झालेल्या मृत्यूसह जिल्हयातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4 वर गेला आहे.

District General Hospital Buldana
जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा

By

Published : Apr 1, 2020, 12:05 PM IST

Updated : Apr 1, 2020, 3:35 PM IST

बुलडाणा - मंगळवारी बुलडाण्यात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज (बुधवार) पुन्हा एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे 28 मार्च रोजी कोरोनाबाधित रुग्णाच्या झालेल्या मृत्यूसह जिल्हयातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4 वर गेला आहे. विशेष म्हणजे सध्या 8 रुग्णांचे नमुने अहवाल येणे बाकी आहे. त्यातील तीन रुग्णांना 'आयसोलेशन' कक्षात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा...भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 397 वर, नागरिकांनी सहकार्य न केल्यानं रुग्ण वाढले - आरोग्य मंत्रालय

बुलडाणा जिल्ह्यात शनिवार 28 मार्च रोजी एका 45 वर्षीय रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात मृत्यू झाला होता. रविवारी 29 मार्च रोजी त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 60 व्यक्तींपैकी पहिल्या दिवशी 24 जणांचे तर दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा आठ जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले. त्यात एकूण 32 नमुन्यांपैकी 30 मार्च रोजी सायंकाळी 20 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तर मंगळवार 31 मार्च रोजी सकाळी पुन्हा त्यातील 2 अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. तर उर्वरित 9 रुग्णांच्या अहवालांपैकी एकाचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 8 रुग्णांच्या चाचणी अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

Last Updated : Apr 1, 2020, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details