महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर कॅबिनेट मंत्रीपदापासून मला कोणीच रोखू शकलं नसतं- आनंदराव अडसूळ - Shivsena

बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आनंदराव अफसूळ यांचा यावेळी नवनीत राणा यांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर आज आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीकरांचे आभार व्यक्त केले.

आनंदराव अडसूळ

By

Published : Jun 1, 2019, 9:22 PM IST

बुलडाणा- सलग पाचव्यांदा निवडून आल्यावर मी सहाव्या निवडणुकीत पराभूत झालो. कितीही मोठा नेता असला तरी लोकशाहीसमोर त्याला हार पत्करावी लागते. यावेळी माझा नसला तरी माझ्या नशिबाचा दोष होता. जर मी निवडून आलो असतो तर कॅबिनेट मंत्री पदापासून मला कोणीही रोखू शकले नसते, असे मत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले आहे.

निवडणूक निकालानंतर आज आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीकरांचे आभार व्यक्त केले.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आनंदराव अफसूळ यांचा यावेळी नवनीत राणा यांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर आज आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीकरांचे आभार व्यक्त केले. माझा जवळपास ३७ हजार मतांनी पराभव झालेला आहे. जनतेचा कौल मी स्वीकारला आहे. माझ्या अर्धांगिणीला रुग्णालयात नेणे अत्यावश्य असल्याने मी मतमोजणीच्या दिवशीच मुंबईला निघून गेलो, असे अडसूळ यांनी सांगितले.

मागच्या तुलनेत माझ्या मतांध्ये वाढ झाली आहे. यामुळे जनतेने मला पूर्णपणे नाकारलेच नाही हे स्पष्ट होते. आता विधानसभा निवडणुकीची तयारी आम्हाला जोमात करायची आहे. बडनेरा, दर्यापूर, तिवसा या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असतील. आमदार रवी रणा यांच्या बडनेरा मतदारसंघात आम्हाला मतांची मोठी आघाडी मिळाली. हाच माझा मोठा विजय आहे. असेही अडसूळ यांनी सांगितले.

शिवसैनिकांनी प्रामाणिक काम केल्याने माझ्या मतांमध्ये मागील निवडणुकीपेक्षा वाढ झाली आहे. तसेच भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्षांनी निवडणूक काळात काय केले हे सर्वांना ठाऊक आहे. ते ५ कोटी रुपयांची डील करीत असल्याचा ऑडिओ सर्वांना ठाऊक आहे. यामुळे त्यांनी किती प्रामाणिक काम केले हे स्पष्ट होते, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details