बुलडाणा- बुलडाण्यात ऑफलाइन घेण्यात आलेली नीट परीक्षेची उत्तर पत्रिका परीक्षा संपल्यानंतर तब्बल एक तास परीक्षार्थीकडे बाहेर असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित परीक्षार्थीकडून ही उत्तर पत्रिका पुन्हा जमा करून घेण्यात आली. दरम्यान, या परिक्षार्थीने चुकीने जी शाळेत जमा असते त्या उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी सोबत नेली होती, असे स्पष्टीकरण केंद्रप्रमुखांनी नंतर दिले.
हेही वाचा -वाढदिवसाला कपडे भेट देऊन दाजीचा अल्पवयीन मेहुणीवर कारमध्ये बलात्कार, बुलडाण्यातील प्रकार
परीक्षा केंद्राबाहेर गेलेल्या उत्तरपत्रिकेची चौकशी होणे गरजेची
रविवारी 12 सप्टेंबर रोजी देशासह राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी, एकाच वेळी ऑफलाईन नीटची परीक्षा घेण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात देखील नीटची परीक्षा घेण्यात आली. बुलडाणा शहरात सहकार विद्या मंदिर, श्री शिवाजी विद्यालय आणि जांभरूळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा घेण्यात आली. जांभरूळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावर 1 पासून 12 खोल्यांत 120 परीक्षार्थींनी नीटची परीक्षा दिली. संध्याकाळी 5 वाजता परीक्षा संपल्यावर खोली क्र. 9 मधील एका परीक्षार्थीची उत्तर पत्रिका केंद्राबाहेर गेल्याचे समोर आले. यानंतर याबाबतची माहिती विचारल्यावर तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावरील उपस्थित केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.