बुलडाणा - शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप-शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. निर्णय झाला तेव्हा मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री झोपले होते का, असा सवालही त्यांनी केला आहे. महाआघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ देऊळगाव राजा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
तेव्हा मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री झोपले होते का; गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरून अमोल कोल्हेंचा घणाघात - अमोल कोल्हे बुलडाणा
गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय झाला तेव्हा मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री झोपले होते का, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. महाआघाडी चे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ देऊळगाव राजा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे
हेही वाचा -भाजपने फक्त आश्वासनांची खैरात वाटली; ओवैसींचे टीकास्त्र
कोल्हे म्हणाले, "शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी, बारा बलुतेदारांनी आपले रक्त सांडून किल्ले बांधले, ते जपले. 3 सप्टेंबरला तेच किल्ले लग्नकार्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात झाला. निर्णय झाला तेव्हा सरकारचे डोके ठीकाणावर होते काय. शिवसेनेचे मंत्रीदेखील मंत्रीमंडळात होते. त्यामुळे शिवसेनेला मतदान मागण्याचा अधिकार नाही"