बुलडाणा -भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे टायर फुटल्याने नियंत्रणा बाहेर गेलेल्या रुग्णवाहिकीने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 5 लोकांना चिरडले. यामध्ये दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुलडाणा शहराच्या त्रिशरण चौकात बुधवारच्या मध्यरात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये अनिल गंगाराम पडोळकर (29 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. तर माया पडळकर यांचा अकोला येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आपला प्रपंच चालवण्यासाठी त्रिशरण चौकाच्या रस्त्याच्या कडेला पाल टाकून लोखंडी वीळे, कुऱ्हाडी, तवे तयार करून विक्री करण्याचा पडोळकर व सोळंके कुटुंबीय व्यवसाय करत आहे. ते बुधवारी मध्यरात्री झोपले होते. दरम्यान, रुग्णवाहिका भरधाव वेगाने जात असतांना खामगाव-चिखली रोडवरील त्रिशरण चौकात रुग्णवाहिकेचे टायर फुटल्याने रुगवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपल्या पडोळकर व सोळंके कुटुंबीयांना चिरडले. यामध्ये पडोळकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर माया पडळकर यांचा अकोला येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यासोबतचे बेबाबाई सोळंके, आकाश पडोळकर व शेषराव सोळंके, हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बुलडाणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णवाहिका मालकाला कोलवड येथून अटक-
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू, पोलीस हवालदार प्रशांत शास्त्री, माधव पेटकर, गंगेश्वर पिंपळे, अमोल खराडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर सर्व जखमींना उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात हलविले. त्यानंतर या अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी तपास सुरू केला असता ही रुग्णवाहिका कोलवड येथील योगेश पुंजाजी जाधव यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
बुलडाण्यात रुग्णवाहिकेने चिरडल्याने दोघांचा मृत्यू, तिघे जखमी - Accident news
भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे टायर फुटल्याने नियंत्रणा बाहेर गेलेल्या रुग्णवाहिकीने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 5 लोकांना चिरडले.
बुलडाण्यात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 5 व्यक्तींना रुग्णवाहिकेने चिरडले
यानंतर तात्काळ पोलिसांनी चालक मालकासह रुग्णवाहिका ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चालक मालक योगेश जाधव यांच्याविरुध्द कलम 279, 337, 338, 427, 304, भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक सुधाकर गवारगुरू हे करीत आहेत.
हेही वाचा-लस ही कवच-कुंडल.. मात्र लस घेतल्यानंतरही होऊ शकतो कोरोना - राजेश टोपे