बुलडाणा - जिल्ह्यामध्ये 19 व 20 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने बनविला असून तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत चार-पाच वेळा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आहे. मूग व उडीद आणि सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान झाले असून या पिकांच्या शेंगांना अक्षरश: कोंब आले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास 121 गावांतील शेती बाधित झाली आहे. सर्वाधिक नुकसान सिंदखेडराजा तालुक्यात झाले असून बुलडाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद व देऊळगाव राजा या तालुक्यातील जवळपास 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. हेही वाचा -शेगावातील टेलरने पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या मास्कचा प्रधानमंत्री कार्यालयाकडून स्वीकार
याचा अहवाल कृषी विभागाने बनविला असून तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत अहवाल तर प्रशासनाकडे सादर झाले आहेत. मात्र, आता शासनाकडून शेतकऱ्यांना मदत कधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -बुलडाणा जिल्ह्यातील गुरांवर 'लम्पी' रोगाचे आक्रमण