बुलडाणा - वडील शेतात हिस्सा देत नाहीत, पत्नीच्या उपचारांसाठी पैसे देत नसल्याचा राग मनात धरून दत्तक मुलाने वडिलांची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला वडिलांना सर्पदंश झाला असून हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची अफवा त्याने पसरवली होती. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांचा गळा आवळल्याचे उघड झाले. निवृत्ती पुंडलीक दळभंजन (वय ४५, सगोडा, ता. शेगाव) असे मृताचे नाव आहे.
संपत्तीच्या वादातून बापाची गळा आवळून हत्या, सर्पदंश झाल्याची उठवली होती अफवा - बुलडाणा गुन्हे बातम्या
वडिलांना सर्पदंश झाला असून हृदयविकाराचा झटका आल्याचे भासवून नातेवाईकांना आणि गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना खोटी माहिती दिली. मात्र, या प्रकरणात अकोला वैद्यकीय महाविद्यालयाचा शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यात मृताला दोरीने गळा आवळून मारले असल्याचे सांगण्यात आले.
वडिलांना सर्पदंश झाला असून हृदयविकाराचा झटका आल्याचे भासवून नातेवाईकांना आणि गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना खोटी माहिती दिली. मात्र, या प्रकरणात अकोला वैद्यकीय महाविद्यालयाचा शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यात मृताला दोरीने गळा आवळून मारले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सोपान दळभंजन या दत्तकपुत्राला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.
हेही वाचा -गोव्याची दारू सोलापुरात जप्त; ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
४ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात निवृत्ती दळभंजन यांना दाखल केले होते. तपासणी करून दळभंजन हे आधीच मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांनतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, या प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा अकोला वैद्यकीय महाविद्यालयाचा फॉरेन्सिक अहवाल आला आणि सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी खाक्या दाखविल्यावर आपणच संपत्तीच्या वादातून वडिलांची हत्या केल्याची कबुली सोपानने दिली आहे.