महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दहा वर्षाची शिक्षा

जळगाव जामोद तालुक्यातील ज्ञानेश्वर रमेश घुले यांने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी त्याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयान दहा वर्षाची शिक्षा ठोठावली.

additional-district-sessions-court-sentenced-the-rapist-to-ten-years-for-a-minor-girl
चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दहा वर्षाची शिक्षा

By

Published : Dec 5, 2019, 6:53 AM IST

बुलडाणा -दोन वर्षांपूर्वी एका ३ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बुलडाण्याच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. पीडीत चिमुरडीसह तिचे आई-वडील व डॉक्टर यांची साक्ष या प्रकरणात महत्वाची ठरली.

दोन वर्षांपूर्वीजळगाव जामोद तालुक्यातील या आरोपीने चॉकलेटचे अमिष दाखवून घराशेजारील ३ वर्षीय मुलीवर लैंगक अत्याचार केला होता. प्रकार उघडकीस आल्यानंतर या पीडीत मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ एप्रिल २०१६ ला आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (आय) भा.द.वि.सह कलम ३,४ बालकांचे लैगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

घटनेनंतर आरोपी काही दिवस फरार होता. मात्र, २ मे २०१६ ला त्याने स्वतः पोलिसांसमोर आत्मसर्मपन करून गुन्ह्याची कबुली दिली होती. या घटनेचा तपास जळगाव पोस्टेचे तत्कालीन पोलीस निरिक्षक राठोड व त्यांचे सहकारी शिपाई राजु टेकाळे यांनी अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणाची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्याव्दारे झाली. यामध्ये ८ साक्षीदार तपासण्यात आले. पीडीत चिमुरडीसह तिचे आई-वडील व डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली. यामध्ये न्यायाधीश देशपांडे यांनी कलम ३७६ व पोस्को कायद्याअंतर्गत प्रत्येकी १० वर्ष कारावास णि १ हजार रूपये दंड ठोठावला आहे. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकिल म्हणून अ‍ॅड. राजेश्वरी अजय आळशी यांनी काम पाहिले.

ABOUT THE AUTHOR

...view details