महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलढाण्यातील जवानाचा अपघाती मृत्यू; मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

पंजाबमध्ये सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवान गावी सुटीवर आला होता. सुटीवर आल्यानंतर त्याच्या मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा काल 24 जानेवारी रोजी सकाळी मृत्यू झाला.

Accidental Death of Jawan in Buldhana; Funeral in Native Village with State Funeral
बुलढाण्यातील जवानाचा अपघाती मृत्यू; मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By

Published : Jan 25, 2023, 9:24 PM IST

बुलढाणा :आज त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी सोनेवाडी येथे आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील सैनिक रवींद्र पांडुरंग राखोंडे, वय 26, असे मृत जवानाचे नाव असून, ते नांदेड येथे सन 2016 मध्ये भरती झाले होते.

जवान या ठिकाणी होते कार्यरत :सध्या ते पंजाब येथे आपले कर्तव्य बजावत होते. सध्या 1 जानेवारीला तो घरी सोनेवाडी येथे सुटीवर घरी आले होते. यावेळी दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, चार बहिणी, पत्नी अनी एक वर्षाचा मुलगा आहे.

त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात केले अंत्यसंस्कार :अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या जवानाचा त्याच्या मूळ सोनेवाडी या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. महिन्यापूर्वी गावी आला असताना मोटार सायकलचा अपघात झाला होता. पुणे येथे उपचरादरम्यान या जवानाने अखेरचा श्वास घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details