बुलढाणा - खामगाव-जालना मार्गावर बोलेरो आणि ट्रकच्या भीषण अपघात झाला. ( Bolero-Truck Major Accident ) या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. बोलेरो चालक, 1 महिला आणि 3 पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. जखमींना देऊळगाव राजा ( Deulgaon Raja ) आणि जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातील नेर या गावातील काही लोक शेगाव येथे येत असताना खामगाव जालना रस्त्यावरील देऊळगाव राजा रस्त्यावर असलेल्या जालना टी पॉईंटवर बोलरो आणि ट्रकमध्ये अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यामधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले आहे. जखमींना देऊळगाव राजा आणि जालना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.