महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात पोलीस व्हॅनची ट्रॅक्टरला जोरदार धडक; दोन जण किरकोळ जखमी - बुलडाणा अपघात

सोनाळा पोलीस ठाण्याची बोलेरो व्हॅन बुलडाणा पोलीस मुख्यालयात दुरुस्तीकरीता आणली होती. दुरूस्तीनंतर आज (मंगळवारी) सकाळी ट्रायल घेण्याकरीता ही व्हॅन खामगाव रोडवर नेली असता, कोलवड येथून गिट्टी खदानकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला सुंदरखेड या ठिकाणी पोलीस व्हॅनने समोरून धडक दिली.

buldana accident
बुलडाण्यात पोलीस व्हॅनची ट्रॅक्टरला जोरदार धडक; दोन जण किरकोळ जखमी

By

Published : May 19, 2020, 4:40 PM IST

बुलडाणा - सुंदरखेड जवळ पोलीस व्हॅनने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवर बसलेले दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज (मंगळवारी) घडली. अपघातामध्ये ट्रॅक्टर आणि पोलीस व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले आहे.

सोनाळा पोलीस ठाण्याची बोलेरो व्हॅन बुलडाणा पोलीस मुख्यालयात दुरुस्तीकरीता आणली होती. दुरूस्तीनंतर आज (मंगळवारी) सकाळी ट्रायल घेण्याकरीता ही व्हॅन खामगाव रोडवर नेली असता, कोलवड येथून गिट्टी खदानकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला सुंदरखेड या ठिकाणी पोलीस व्हॅनने समोरून धडक दिली. त्यात ट्रॅक्टर चालक मुरलीधर जाधव आणि पुंडलिक जाधव हे दोघे जखमी झाले आहे. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details