महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी आंदोलन: शेगावात ट्रॅक्टर रॅली काढून कृषी कायद्यांचा विरोध - Farmers Movement Support Congress Buldana

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात व शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ शेगाव येथे काल सायंकाळी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Farmers Movement Delhi
काँग्रेस ट्रॅक्टर रॅली शेगाव

By

Published : Jan 9, 2021, 6:22 PM IST

बुलडाणा - मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात व शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ शेगाव येथे काल सायंकाळी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आदी नेते ट्रॅक्टरमध्ये बसले होते. तर, काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत असल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.

माहिती देताना माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे

राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक संघटनेचा पाठिंबा

गेल्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र, यात कोणताही निकाल लागला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष, तसेच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काल शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेगावात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांनी ही रॅली निघाली व तहसील कार्यालयावर पोहोचली. तेथे सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले, नंतर ट्रॅक्टर रॅलीची सांगता झाली.

हेही वाचा -LIVE updates: भंडारा रुग्णालयातील आगीत 10 बालकांचा मृत्यू; 5 लाखांची मदत जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details