महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्याच्या सीआरपीएफ जवानाला वीरमरण - जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शनिवारी 18 एप्रिलला सीआरपीएफच्या तीन जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये सोपोर दहशतवादी हल्ल्यात बिहारमधील वैशाली येथील 42 वर्षीय राजीव शर्मा, महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 38 वर्षीय चंद्रकांत भगवंत भाकरे, गुजरातमधील साबरकांठा येथील 28 वर्षीय परमार सत्यपाल सिंह या तीन जवानांना वीरमरण आले.

soldier chandrakant bhakare  जवान चंद्रकांत भाकरे  जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ला  jammu-kashmir-terrorist-attack
हुतात्मा जवान चंद्रकांत भाकरे

By

Published : Apr 19, 2020, 12:19 PM IST

बुलडाणा - जम्मू-काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शनिवारी 18 एप्रिलला सीआरपीएफच्या तीन जवानांना वीरमरण आले आहे. तर 2 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. वीरमरण आलेल्यामध्ये महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ३८ वर्षीय चंद्रकांत भगवंत भाकरे यांचा समावेश आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी एक दिवस अगोदर शुक्रवारी काश्मीरला भेट दिली होती. त्यानंतर शनिवारी हा हल्ला झालाय.

दहशतवाद्यांनी अहमद बाबा चौकाजवळील नूरबाग भागात हा हल्ला केला. जखमी सैनिकांना तातडीने जवळच्या एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सीआरपीएफच्या दोन जवानांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर काही वेळात दुसऱ्या जखमी जवानाचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात काही पॅरामिलिट्री जवान जखमी झाल्याची माहिती आहे. सोपोरच्या एसपींच्या माहितीनुसार, घटनेनंतर लवकरच सुरक्षा दलाने परिसर घेरला आणि हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न चालू आहे.

सोपोर दहशतवादी हल्ल्यात बिहारमधील वैशाली येथील 42 वर्षीय राजीव शर्मा, महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 38 वर्षीय चंद्रकांत भगवंत भाकरे, गुजरातमधील साबरकांठा येथील 28 वर्षीय परमार सत्यपाल सिंह या तीन जवानांना वीरमरण आले.

दरम्यान, शुक्रवारी नियंत्रण रेषेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लष्कर प्रमुख नरवणे सैन्याची तयारी पाहून समाधानी होते. स्थानिक कमांडर यांनी नरवणे यांना सद्य सुरक्षा परिस्थिती आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जम्मूकाश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानकडूनही सीमेवरील संघर्षबंदीचे सतत उल्लंघन केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details