महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात मादी अस्वलाने पिलासाठी फोडला मायेचा हंबरडा - बुलडाणा अस्वलांचे माहेर घर

अभयारण्यामध्ये जवळपास 35 ते 36 अस्वालांची संख्या असल्याचे वन्यजीव अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते आहे. नेहमी प्रमाणे वन्यजीव विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांनाच, जंगलात एक अस्वल वेगळ्याच आवाजात ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा या कर्मचाऱ्याचे लक्ष त्या दिशेने गेल. त्यांना एक अस्वल इकडे तिकडे काही तरी शोधत असल्याचं लक्षात आले.

अस्वल
अस्वल

By

Published : Apr 12, 2021, 7:47 PM IST

बुलडाणा -जगात आई आणि मुलाचं नातं हे सर्वश्रृत आहे. मानव असो कि प्राणी आई ही आईच असते. आईपासून आपला पिल्लू दूर गेला की आईची तगमग होते, अशीच तगमग बुलडाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात मादी अस्वलाची झाल्याचे पहायला मिळाले. आपला पिल्लु दूर गेल्याने त्याला शोधण्यासाठी अभयारण्यात मादी अस्वलाने हंबरडा फोडला,अन् त्याा आईजवळ त्याचा पिल्लू आला. या सर्व घटनाक्रमाचा व्हिडिओ एका वन्यजीव कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.


ज्ञानगंगा अभयारण्य आहे अस्वलांचे माहेर घर
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांच माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. या अभयारण्यामध्ये जवळपास 35 ते 36 अस्वालांची संख्या असल्याचे वन्यजीव अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते आहे. नेहमी प्रमाणे वन्यजीव विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांनाच, जंगलात एक अस्वल वेगळ्याच आवाजात ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा या कर्मचाऱ्याचे लक्ष त्या दिशेने गेल. त्यांना एक अस्वल इकडे तिकडे काही तरी शोधत असल्याचं लक्षात आले. तेवड्यात दुसऱ्या बाजूने एक अस्वलाच पिल्लू धावत त्या अस्वलाकडे निघाल आणि जेव्हा ते अस्वलाच पिल्लू आपल्या आई जवळ गेला. तेव्हाची ही दृश्य शब्दात व्यक्त होणारे नव्हते, ते फक्त डोळ्यात साठवून ठेवावीत, अशी भावना वनरक्षक अनिल गवई यांनी व्यक्त केली आहे.

अस्वलाने पिलासाठी फोडला मायेचा हंबरडा

हेही वाचा-VIDEO : झाडावर वीज कोसळून लागली आग; कोल्हापुरातल्या वाठारमधील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details