बुलडाणा - शासकीय अध्यापक महाविद्यालयात साफ-सफाईचे काम करत असताना एका कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे शेख शोहेब शेख कलीम (वय 20) या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली.
विजेचा धक्का लागल्याने सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; शासकीय अध्यापक महाविद्यालयातील घटना - बुलडाणा सफाई कर्मचारी मृत्यू
बुलडाण्यात चिखली रस्त्यावर शासकीय अध्यापक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील एका सफाई कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
शेख शोहेब शेख कलीम
चिखली रस्त्यावरील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या जाळीला विद्युत तार स्पर्शून गेली आहे. आज दुपारी सफाई कर्मचारी शोहेब त्याठिकाणी साफ-सफाईचे काम करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला व तो खाली पडला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.