बुलडाणा -जिल्ह्यातील मेहकर नगर पालिकेतील काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी यांच्यासह तिघांवर बाल विवाह लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकरच्या काँग्रेस नगराध्यक्षावर बाल-विवाह लावल्याने गुन्हा दाखल - Wedding
शहरात २८ एप्रिल रोजी मुस्लीम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये २४ जोडप्यांपैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यांचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले.
शहरात २८ एप्रिल रोजी मुस्लीम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये बालविवाह झाल्याची तक्रार महिला व बालविकास अधिकारी यांना मिळाली होती. तक्रारीवरून महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता २४ जोडप्यांपैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यांचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले.
या विवाहामध्ये कासम गवळी हे वधू कडील वकील होते. मेहकर बालविकास अधिकारी दिगंबर खुटावकर यांच्या तक्रारीवरुन मेहकर शहरातील काँग्रेस नगराध्यक्ष कासम गवळी यांच्यावर मेहकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.