महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात कोरोनामुळे अजूनही 5 ते 8 वी पर्यंतच्या तब्बल 973 शाळा आहेत बंद - बुलडाणा बातमी

27 जानेवारीपासून सुरू झालेल्या 5 ते 8 वीच्या शाळेमधील 13 शिक्षक व 23 शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 36 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने व काही अहवाल प्रलंबित असल्याने बुलडाण्यातील 1520 शाळांपैकी तब्बल 973 शाळा बंद असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समोर आली आहे.

बुलडाण्यात कोरोनामुळे अजूनही 5 ते 8 वी पर्यंतच्या तब्बल 973 शाळा आहेत बंद
बुलडाण्यात कोरोनामुळे अजूनही 5 ते 8 वी पर्यंतच्या तब्बल 973 शाळा आहेत बंद

By

Published : Feb 2, 2021, 10:16 PM IST

Updated : Feb 2, 2021, 11:20 PM IST

बुलडाणा - 27 जानेवारीपासून सुरू झालेल्या 5 ते 8 वीच्या शाळेमधील 13 शिक्षक व 23 शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 36 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने व काही अहवाल प्रलंबित असल्याने बुलडाण्यातील 1520 शाळांपैकी तब्बल 973 शाळा बंद असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समोर आली आहे. सुरू असलेल्या शाळांमध्ये जवळपास 60 ते 70 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असते.

बुलडाण्यात ९७३ शाळा बंद
3 हजार 511 शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी-कोरोना संकटामुळे मागील 10 महिन्यांपासून बंद असलेल्या 5 ते 8 वीच्या शाळा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार 27 जानेवारीपासून कोरोनाच्या नियमांचे पालन करत बुलडाण्यात शाळा सुरू करण्यात आले. जिल्ह्यात एकूण 5 ते 8 वीपर्यंतच्या 1 हजार 520 शाळा असून त्यामध्ये 1 लाख 84 हजार 500 इतके विद्यार्थी संख्या आहे. शाळा सुरू करण्याच्या अगोदर शाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी आवश्यक असल्याने आत्तापर्यंत 7 हजार 482 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार 511 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी केली गेली असून यामध्ये काही शाळांमध्ये कोरोना अहवाल न आल्याने तसेच काही शाळेमधील 13 शिक्षक व 23 शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 36 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आले असून तब्बल 973 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. तर 547 शाळा सुरू करण्यात आल्या आहे. सुरू करण्यात आलेल्या शाळेमध्ये सद्या 60 ते 70 टक्के विद्यार्थी उपस्थित होत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 2, 2021, 11:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details