बुलडाणा - संग्रामपुर तालुक्यातील चांगेफळ बु. येथील बाजार गावाच्या रोडलगत असलेले चिंचेचे झाड कोसळून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची, तर 3 युवक जखमी झाल्याची घटना आज 29 सप्टेंबररोजी दुपारी घडली. मृतकाचे नाव अवेश सुभाष साबे (9), तर जखमीत दशरथ ओंकार खंडेराव (50), आनंद संजय वानखडे (30), नितिन अनंता लोढे (30) सर्व रा. चांगेफळ बु. यांचा समावेश आहे.
चिंचेचे झाड अंगावर कोसळून 9 वर्षीय बालक ठार, 3 गंभीर जखमी - बुलडाणा ताज्या घडामोडी
चांगेफळ बु. येथील बाजार रोडच्या लगत असलेल्या चिंचेचा झाडाजवळ गावातील नागरिक बसलेले होते, तर जवळ 9 वर्षीय अवेश सुभाष साबे नामक मुलगा खेळत होता. 3 वाजता दरम्यान पोकळ जीर्ण चिंचेचे झाड कोसळुन 9 वर्षीय अवेश याचा जागीच मुत्यु झाला, तर झाडाखाली दबून दशरथ ओंकार खंडेराव, आनंद संजय वानखडे, नितिन अनंता लोढे हे तिघे गंभीर जखमी झाले. गावातील नागरिकांच्या मदतीने बालकांवर पडलेले झाड कापून सदर मुलाचे प्रेत बाहेर काढण्यात आले.
चांगेफळ बु. येथील बाजार रोडच्या लगत असलेल्या चिंचेचा झाडाजवळ गावातील नागरिक बसलेले होते, तर जवळ 9 वर्षीय अवेश सुभाष साबे नामक मुलगा खेळत होता. 3 वाजता दरम्यान पोकळ जीर्ण चिंचेचे झाड कोसळुन 9 वर्षीय अवेश याचा जागीच मृत्यू झाला, तर झाडाखाली दबून दशरथ ओंकार खंडेराव, आनंद संजय वानखडे, नितीन अनंता लोढे हे तिघे गंभीर जखमी झाले. गावातील नागरिकांच्या मदतीने बालकांवर पडलेले झाड कापून सदर मुलाचे प्रेत बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे, बीट जमदार राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतक बालकाला वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात छवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले. तर घटनेत जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर शेगाव रेफर करण्यात आले.