महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना : बुलडाण्यातील बाधितांचा आकडा वाढला, मरकझला गेलेल्या आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह - कोरोना विषाणू

बुलडाण्यात 42 वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हा आकडा मृत रुग्णासह 5वर गेला होता. त्यानंतर तर दिल्ली येथील निजामुद्दीन मरकझमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या 17 नागरिक व त्यांच्या संपर्कात आलेल्या 30च्या जवळपास लोकांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

Buldana
बुलडाण्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला

By

Published : Apr 5, 2020, 5:03 PM IST

बुलडाणा- राज्यात कोणाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असताना बुलडाणा जिल्ह्यातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा 9वर गेला आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकझला गेलेल्या 3 जणांचा अहवाल आज (रविवारी) सकाळी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काही वेळातच आणखी एका तबलिगीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हे 4 जण चिखली 2, खामगाव आणि देऊळगाव राजा तालुक्यतील प्रत्येकी 1 असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.

दरम्यान, बुलडाण्यात 42 वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हा आकडा मृत रुग्णासह 5वर गेला होता. त्यानंतर तर दिल्ली येथील निजामुद्दीन मरकझमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या 17 नागरिक व त्यांच्या संपर्कात आलेल्या 30च्या जवळपास लोकांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 3 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details