बुलडाणा -एकीकडे समाजातील स्वत:ला अतिसुशिक्षित समजणारा समाज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या असणाऱ्या उत्सवाकडे पाठ फिरवताना दिसतो. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील एका 87 वर्षांच्या आजोबांनी सकाळीच मतदान केले. आणि नवयुवक तरूणांसमोर आदर्श निर्माण केला. यावेळी त्यांना इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
बुलडाण्यात 87 वर्षांचे उत्साही मतदार, इतरांनाही केले मतदानाचे आवाहन - maharashtra assembly election live update
बुलडाण्यातील वानखेडे ले आउटमध्ये शेख हबीब शेख वजीर नावाचे 87 वर्षांचे व्यक्ती राहतात. मतदान यादीत ज्या वर्षापासून त्यांचे नाव आले त्यावेळी पासून ते मतदान करत आहेत.
हेही वाचा -अक्कलकोटमधील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदानापासून राहणार वंचित?
बुलडाण्यातील वानखेडे ले आउटमध्ये शेख हबीब शेख वजीर नावाचे 87 वर्षांचे व्यक्ती राहतात. मतदान यादीत ज्या वर्षापासून त्यांचे नाव आले त्या वेळी पासून ते मतदान करत आहेत. यावेळी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानात आपला हक्क बजावला. त्यांनी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी मतदान केले. विशेष म्हणजे बुलडाणा शहरात सकाळपासुन धुके आणि अल्प प्रमाणात पाऊस असतानाही त्यांनी मतदान केले. प्रत्येक मतदारांनी मतदान करायलाच पाहिजे. मतदान दिवस हा तुमचा अधिकार बजावण्याचा सण आहे.