बुलडाणा - सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील त्या 8 वर्षीय कोरोनाग्रस्त चिमुकलीला 10 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ताप व अन्य कुठलीही लक्षणे नसल्यामुळे सरकारच्या नवीन दिशानिर्देशाप्रमाणे मुलीला आज कोव्हिड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सदर मुलगी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथून बुलडाण्यात परतली होती.
मुंबईवरून बुलडाण्यात आलेल्या 'त्या' 8 वर्षीय चिमुकलीला रुग्णालयातून सुट्टी
मलकापूर पांग्रा येथील त्या 8 वर्षीय कोरोनाग्रस्त चिमुकलीला 10 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ताप व अन्य कुठलीही लक्षणे नसल्यामुळे सरकारच्या नवीन दिशानिर्देशाप्रमाणे मुलीला आज कोव्हिड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यात 36 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद असून सध्या 8 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. 3 बुलडाणा 3 खामगाव आणि 2 शेगावला येथे कोव्हिड रुग्णालयात भरती आहे. मलकापूर पांग्रा येथील 8 वर्षीय चिमुकलीला गेल्या दोन महिन्यांपूर्वी किडनी फेल झाल्याने उपचारासाठी तिच्या आईवडिलांनी तिला मुंबईला जेजे रुग्णालयात नेले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, जेजे रुग्णालयात तिचा कोरोनासंदर्भात स्वॅबचा नमुना घेण्यात आला. नियमानुसार तिला कोरोनाचा अहवाल आल्यानंतर सुट्टी देणे अनिवार्य होते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अहवाल येण्याच्या अगोदरच तिला सुट्टी देऊन दिली. सुट्टी देण्यात आलेल्या कागदपत्रांवर सर जेजे मार्ग पोलीस स्टेशनमधून या चिमुकलीला बुलडाण्यासाठी जाण्यासाठी दिलेल्या परवानगीवरून आई-वडिलांनी तिला खासगी वाहनाने बुलडाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेरड़ा पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर पांग्रा येथे 550 किलोमीटरचा प्रवास करून बुधवारी 13 मे रोजी मध्यरात्री 3 वाजता आणले होते. दरम्यान, सदर चिमुकली आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या पोर्टलवर कोरोना पॉझिटिव्ह दर्शविण्यात आली होती. तेव्हापासून या चिमुकलीचा बुलडाण्यात कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला कोरोनाचे लक्षणे न आल्याने आज शनिवारी सुट्टी करण्यात आली.