महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 16, 2021, 7:09 AM IST

ETV Bharat / state

बुलडाणा ग्रामपंचायत निवडणुकीत 63.84 टक्के मतदान

जिल्ह्यात मतदानासाठी 4 लक्ष 82 हजार 458 महिला मतदार तर 4 लक्ष 88 हजार 209 पुरुष मतदार होते. एकूण मतदार संख्या 9 लक्ष 70 हजार 667 अशी होती. त्यापैकी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 3 लक्ष 11 हजार 312 महिला  मतदारांनी तर 3 लक्ष 8 हजार 323 पुरुष अशा एकूण 6 लक्ष 19 हजार 635 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.

mh_bul_63.84 percent turnout_mh10038
बुलडाणा ग्रामपंचायत निवडणुकीत 63.84 टक्के मतदान

बुलडाणा - जिल्ह्यात 498 ग्रामपंचायतीसाठी काल शुक्रवारी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. या मतदानातून 3 हजार 891 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह या गावपातळीवरील लोकशाहीच्या उत्सवात दिसला. मतदानात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 63.84 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

दुपारी 3:30 वाजेपर्यंत मतदान करण्यात महिला अग्रेसर

जिल्ह्यात मतदानासाठी 4 लक्ष 82 हजार 458 महिला मतदार तर 4 लक्ष 88 हजार 209 पुरुष मतदार होते. एकूण मतदार संख्या 9 लक्ष 70 हजार 667 अशी होती. त्यापैकी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 3 लक्ष 11 हजार 312 महिला मतदारांनी तर 3 लक्ष 8 हजार 323 पुरुष अशा एकूण 6 लक्ष 19 हजार 635 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. या मतदानाची महिलांच्या मतदारांची टक्केवारी 64.53, पुरुष मतदारांची 63.15 एकूण टक्केवारी 63.84 आहे.

हेही वाचा - नेमबाजपटू सौरभ चौधरीचा विश्वविक्रम, मनु भाकरही अव्वल

ABOUT THE AUTHOR

...view details