बुलडाणा - कोरोना आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या अंत्यविधीत १०० नागरिक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
धक्कादायक..! कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीत १०० व्यक्ती सहभागी? - buldhana death
कोरोना आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुलडाण्यात खळबळ उडाली आहे.
या व्यक्तीवर काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये शनिवारी सकाळी 8 वाजता भरती करण्यात आले. त्यानंतर 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या व्यक्तीला कोरोना होता का, याबाबतचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले होते.
आज (रविवार) सदर रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले. अहवाल येताच प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना तपासणीसाठी त्यांचे घर गाठले. धक्कादायक बाब म्हणजे त्या मृत रुग्णाच्या अंत्यविधीमध्ये १००च्या आसपास नागरिक उपस्थित होते. सदर मृत व्यक्ती हा एका शाळेच्या प्राचार्य पदावर कार्यरत होता.