बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली शहरातील सैलानी नगर जवळील तसेच शहरातून वाहून जाणाऱ्या जांबुवंती नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सै. रिजवान सै. फिरोज, शे. साजिद शे.शाफिक, शे. तोफिक शे. रफिक, वशीम शहा इरफान शहा (वय 15 ते 16, सर्व रा. सैलानी नगर, चिखली) यांचा समावेश आहे.
बुलडाण्यातील जांबुवंती नदीत बुडून 4 जणांचा मृत्यू, शहरात हळहळ - jambuvati river buldana 4 died news
मृत मुले शहराजवळील जांबुवंती नदीत पोहायला गेली होती. मात्र, बराच वेळ झाला म्हणून परत घरी आली नाही. घरातील लोकांनी शोध घेतला असता त्यांना नदीवर त्यांची कपडे दिसल्यावर हा प्रकार लक्षात आला. यांनंतर पाण्यात उतरून लोकांनी शोध घेतला. यानंतर नदीतील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
बुलडाण्यातील जांबुवंती नदीत बुडून 4 जणांचा मृत्यू
हेही वाचा -बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक जोरात
मृत मुले शहराजवळील जांबुवंती नदीत पोहायला गेली होती. मात्र, बराच वेळ झाला म्हणून परत घरी आली नाही. घरातील लोकांनी शोध घेतला असता त्यांना नदीवर त्यांची कपडे दिसल्यावर हा प्रकार लक्षात आला. यांनंतर पाण्यात उतरून लोकांनी शोध घेतला. यानंतर नदीतील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.