बुलडाणा - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून रविवारी (दि. 19 जुलै ) 39 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 742 वर पोहोचला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 200 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 161 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपिड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 132 तर रॅपिड टेस्टमधील 29 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 161 अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मलकापूर - 36 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष, नांदुरा येथील पोलीस क्वार्टरमागे 42 वर्षीय पुरुष, नांदुरा खुर्द 17 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय महिला. खालखेड ता. नांदुरा 56 वर्षीय महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा 80 वर्षीय पुरुष, दे. राजा - 80 वर्षीय महिला, अहिंसा मार्ग 7 वर्षीय मुलगी, 1 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी 21 पुरुष, दुर्गापूरा 40 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, शेगांव येथील दसरा नगर 10 वर्षीय मुलगा, 61 वर्षीय पुरुष, देशमुखपुरा 30 वर्षीय पुरुष, खामगांव : 38 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, वाडी येथील 48 वर्षीय पुरुष, बालाजी फैल 27, 58, 47 व 52 वर्षीय पुरूष, 44 व 51 वर्षीय महिला, फरशी रोड 45 वर्षीय महिला, रायगड कॉलनी 28 वर्षीय पुरूष, राठी प्लॉट 29 वर्षीय पुरूष, सिव्हील लाईन 10 वर्षीय मुलगा, 26 वर्षीय पुरूष, यशोदरा नगर 45 वर्षीय महिला, जळका भडंग ता. खामगांव येथील 65 वर्षीय पुरुष, सुटाळा खुर्द 74 वर्षीय महिला, भालेगाव ता. खामगाव 66 वर्षीय महिला, बुलडाणा - नक्षत्र अपार्टमेंट 54 व 76 वर्षीय महिला व 58 वर्षीय पुरुष, कोथळी ता. मोताळा - 82 वर्षीय पुरुष, संशयित व्यक्ती यांचा समावेश आहे.