महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गोडाऊनमधून 3 लाखांचा गुटखा चोरी - गोडाऊन

अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त करून ठेवलेल्या 17 लाखांच्या गुटख्यापैकी 3 लाखांचा गुटखा चोरी झाल्याची घटना बुधवारी (दि. 11 डिसेंबर) सकाळी उघडकीस आली.

गोडाऊनमध्ये तपासणी करताना ठाणेदार
गोडाऊनमध्ये तपासणी करताना ठाणेदार

By

Published : Dec 12, 2019, 6:22 PM IST

Updated : Dec 12, 2019, 7:17 PM IST

बुलडाणा- स्थानिक प्रशासकीय इमारतीतील अन्न व औषध विभागाच्या कार्यालाशेजारी असलेल्या गोडाऊनमधूनच 3 लाख रुपयांचा गुटखा चोरी गेल्याची घटना बुधवारी (दि. 11 डिसेंबर) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अन्न व औषध विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात अज्ञाता विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त


अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाजवळच जप्त केलेल्या गुटख्याचे गोडाऊन असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तर चोरीला गेलेला गुटखा हा एकाच ठिकाणी जप्त केलेला असल्याची चर्चा सुरू आहे. चोरी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगमताने झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - दिव्यांगांवरील अत्याचाराविरोधात बुलडाण्यात धरणे आंदोलन

शहराच्या मुख्य बसस्थानकासमोरच ही प्रशासकीय इमारत आहे. प्रशासकीय इमारतीत 17 पेक्षा जास्त विभागाचे कार्यालये आहेत. त्यातील एक अन्न व औषध विभागाच्या कार्यालयजवळ जप्त केलेल्या गुटख्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये एकूण 17 लाखांचा जप्त केलेला गुटखा ठेवलेला होता. मंगळवारी (दि. 10 डिसेंबर) रात्री अज्ञात चोरट्यांनी खोलीचे कुलूप तोडले व त्यातील 3 लाखांचा गुटखा चोरला असल्याचे बुधवारी (दि. 11 डिसेंबर) सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणी सहायक आयुक्त अ. रा. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आज गुरुवारी (दि. 12 डिसेंबर) बुलडाणा शहर ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कांबळे यांनी व त्यांच्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा - लहान मुलाचे लैंगिक छळ प्रकरण; आरोपीस 5 वर्षाची शिक्षा

Last Updated : Dec 12, 2019, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details