बुलडाण्यातील तिघांना डिस्चार्ज; डॉक्टरांसह जिल्हाधिकाऱ्यां दिला टाळ्यांनी निरोप - buldana collector news
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार रुग्णांपैकी तिघांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संबंधितांना डिस्चार्ज देताना जिल्हाधिकरी सुमन चंद्रा यांसह सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला.
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार रुग्णांपैकी तिघांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बुलडाणा - कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार रुग्णांपैकी तिघांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिला मृत्यू झालेल्या रुग्णाच्या ते संपर्कात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित उपस्थित होते. यांसोबतच डॉ.मोहम्मद अस्लम, डॉ.भागवत भुसारी, डॉ.सचिन वासेकर यांच्या सह नर्सेस आणि सफाई कामगारांनी टाळ्या वाजवून निरोप दिला.