महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bus Accident in Buldhana : बुलडाणा बस अपघातात 26 जणांचा मृत्यू; रविवारी होणार सामूहिक अंत्यसंस्कार, चालक पोलिसांच्या ताब्यात - पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक व्यक्त

बुलडाणा येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Bus Accident on Samruddhi Expressway) शनिवारी (1 जुलै) पहाटे खासगी बसचा भीषण अपघात (Buldhana Bus Accident) झाला. या बस अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला (26 Killed Bus Accident) आहे. ही बस नागपूरवरुन पुण्याला जात होती. अपघातस्थळाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे. तसेच त्यांनी जखमींचीही रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

buldhana bus accident
बुलडाणा बस अपघात

By

Published : Jul 1, 2023, 1:09 PM IST

Updated : Jul 1, 2023, 7:42 PM IST

बस जळून खाक

बुलडाणा :समृद्धी महामार्गावरून विदर्भ ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे जात होती. सिंदखेडराजाजवळ ही बस (Buldhana Bus Accident) आली होती. त्याचवेळी चालकाच्या बाजूचे टायर अचानक फुटले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस डिवायडरला धडकली व बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली व यात 26 जणांचा जळून मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घटनास्थळी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघात घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. योग्यरित्या चौकशी करणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत.

यंत्रणांकडून प्राथमिक माहिती घेतली असता संपूर्ण यंत्रणा वेळेवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण दुर्दैवाने जीवितहानी टाळू शकलो नाही. समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कसे कमी होतील याकडे सरकार प्रयत्नशील आहे - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

बस चालकावर गुन्हा दाखल - समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे झालेल्या खासगी बस अपघातात 26 जण मृत्युमुखी पडले. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या खासगी बस विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यावर 140/23 कलम 279, 304, 337, 338, 427 आणि मोटर वाहन कायदा 184 अन्वय सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सामूहिक अंत्यसंस्कार - अपघातानंतर सर्वात मोठे आवाहन मृतदेहांची ओळख पटवणे होते. त्याकरिता यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. फॉरेन्सिक टीम डीएनए चाचणी करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.तरी या कामाला चार ते पाच दिवस लागू शकतात, असे मंत्री गिरीश महाजन यांनी नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी उद्या सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे एकमत झाल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच पत्रकारांना बोलताना सांगितले.

ओळख पटलेल्या मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे - आयुष गाडगे, कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इंशांत गुप्ता, गुडीया शेख, अवंती, पोहनकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृक्षाली वनकर, ओवी वनकर, शोभा वनकर.

टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाबाबत आम्ही प्रशासनाला सहकार्य करत आहोत - अपघातग्रस्त बसचे मालक वीरेंद्र दरणे

आरटीओचा अहवाल -भरधाव वेगात असणारी बस समृद्धी महामार्गावर असणाऱ्या लोखंडी पोलवर धडकली. त्यानंतर हा अपघात घडल्याचा अहवाल अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. भरधाव वेगात असणारी ही बस समृद्धी महामार्गावरून धावत असताना रस्ता दुभाजकालगत असणाऱ्या स्टीलच्या खांबाला धडकली. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसच्या उजव्या बाजूचा चाक डिव्हायडरला धडकताच बसचा टायर फुटला. त्यानंतर ही बस पलटली आणि सिमेंट रोडवर दूरपर्यंत घासत गेली. अतिशय वेगात असणाऱ्या या बसचा डिझेल टँक फुटला आणि आधीच प्रचंड गरम असणाऱ्या बसच्या इंजिनने पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बस जळाली. यावेळी बसचे आपत्कालीन दार आणि खिडकी देखील उघडू शकली नाही.

अतिवेग हे अपघाताचे कारण नाही - ही बस रात्री 11 वाजून आठ मिनिटांनी समृद्धी महामार्गावर आली आणि रात्री एक वाजून 32 मिनिटांनी बसचा अपघात झाला. समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटपासून ही बस 152 किलोमीटर अंतरापर्यंत दोन तास 24 मिनिटांनी पोहचली होती. यावरून बसचा वेग हा 70 किलोमीटर प्रतितास होता असे स्पष्ट होत असून, अतिवेग हे या अपघाताचे कारण नसल्याचे अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी राम गीते यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.

समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटपासून ही बस 152 किलोमीटर अंतरापर्यंत दोन तास 24 मिनिटांनी पोहचली होती. यावरून बसचा वेग हा 70 किलोमीटर प्रतितास होता असे स्पष्ट होत असून, अतिवेग हे या अपघाताचे कारण नाही - अमरावती प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी राम गीते

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त - बसच्या भीषण अपघातानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलडाणाजवळ भीषण अपघात झाला. यात 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

घटनास्थळावर मृतदेहाचा खच : खासगी बसचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर स्थानिक गावकरी आणि प्रशासनाने घटनास्थळावर धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत 25 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. बसमधील इतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चार प्रवासी बचावले आहेत. यातील बचावलेल्या प्रवाशांनी अपघातानंतर बसच्या काचा फोडून बाहेर धाव घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. त्यानंतर या प्रवाशांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.

बुलडाणा बस अपघातासंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा येथे -

  1. Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपघाताविषयी शोक व्यक्त; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 5 लाखांची मदत
  2. Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, बसमधील 25 जणांचा होरपळून मृत्यू
  3. Accidents On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले; संशोधनातून 'हे' कारण आले समोर
  4. Buldhana Bus Accident : कारंजात चालक जेऊन झोपला, तो कायमचाच; बसमधील प्रवाशांच्या मृतदेहाचा झाला कोळसा तर काही अर्धवट जळाले
Last Updated : Jul 1, 2023, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details