महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती विभागात 23 हजार 496 परप्रांतीय मजूर अडकल्याची नोंद - अमरावती परप्रांतीय

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यात एकूण 23 हजार 496 परप्रांतीय मजुरांची शासनाकडे नोंद करण्यात आली आहे, तर बुलडाणा जिल्ह्यात 4 हजार 105 परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत.

labor stuck in amravati region  अमरावती विभाग परप्रांतियांची संख्या  अमरावती लेटेस्ट न्युज  अमरावती परप्रांतीय  बुलडाणा परप्रांतीय
अमरावती विभागात 23 हजार 496 परप्रांतीय मजूर अडकल्याची नोंद

By

Published : May 2, 2020, 9:02 AM IST

बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्यात अनेक परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यात एकूण 23 हजार 496 परप्रांतीय मजूर अडकल्याची नोंद शासनाकडे करण्यात आली. यापैकी बुलडाणा जिल्ह्यात 4 हजार 105 परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत. मात्र, सध्या केंद्राकडून या परप्रांतियांना आपल्या घराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..

अमरावती विभागात 23 हजार 496 परप्रांतीय मजूर अडकल्याची नोंद
देशात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे राज्यात मजुरी करत असलेला परप्रांतीय मजूर वर्ग अडकून पडला, तर अनेक परप्रांतीय मजुरांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी पायपीट करून स्थलांतर करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परप्रांतियांचे स्थलांतर थांबविण्याचे आदेश दिले होते. तसेच राज्य सरकाराने सर्व परप्रांतियांची जेवणापासून तर राहण्यापर्यंत व्यवस्था केली. मात्र, अनेकांना घराची ओढ लागली होती. त्यामुळे त्यांनी पायी प्रवास करत आपले घर गाठले, तर काही परप्रांतीय अद्यापही अडकून पडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परप्रांतियांना घरी जाण्यासाठी व्यवस्था करावी,अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती. तसेच इतर राज्यातून देखील या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे केंद्र शासनाने परप्रांतियांना घरी जाण्यासाठी सर्व राज्य सरकारला परवानगी दिली आहे.

दरम्यान, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यात एकूण 23 हजार 496 परप्रांतीय मजुरांची शासनाकडे नोंद करण्यात आली आहे, तर बुलडाणा जिल्ह्यात 4 हजार 105 परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत. यामध्ये आंध्रप्रदेशचे 122, आसामचे 126, बिहारचे 606, छत्तीसगडचे 13, दिल्लीचे 8 , गुजरातचे 12, हरियाणाचे 28, जम्मू-कश्मीरचे 2, झारखंडचे 447, कर्नाटकचे 120, केरळचे 2, मध्यप्रदेशचे 687, ओरिसाचे 42, पंजाबचे 28, राजस्थान 53, तमिळनाडूचे 3, तेलंगाणाचे 248, उत्तरप्रदेशचे 845, पश्चिम बंगालचे 285, गोव्याचा एक, हिमाचल प्रदेशचा एक, चेन्नई एक, महाराष्ट्रमध्ये राहणारे 421, असे एकूण 4 हजार 105 परप्रांतीय मजुरांची बुलडाणा जिल्हा प्रशासनकडे नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details