बुलडाणा - पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सिद्धार्थ सपकाळ ( वय,22, रा. बुलडाणा) याला सात वर्ष सक्त कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा दंड न भरल्यास एक महिन्याची पुन्हा शिक्षा आरोपीला होणार आहे. हा निकाल बुलडाणा येथील सहजिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस महाजन यांनी दिला आहे.
पीडित बालक 3 मे 2019 रोजी सकाळी अंदाजे 8 वाजता आरोपीच्या घरासमोर खेळत होता. त्यावेळी आरोपीने चॉकलेट देतो असे म्हणून बालकाला घरात बोलाविले. बाजूच्या खोलीत नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान त्रासामुळे बालकाने आरडाओरड केली असता आरोपीने त्याला सोडून दिले. आरोपी तेथून पळून गेला. बालकाने सकाळी साडेवाजता रडत घरी जात ही हकीकत आईला सांगितली. बालकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलडाणा: बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीला सात वर्ष सक्त कारावासाची शिक्षा - Buldhana court verdict on abuse case
सर्व साक्षीदारांचे साक्षी व पुरावे घटनेला पुरक व एकमेकांशी सुसंगत असल्याने आरोपीने अत्याचार केल्याच्या निष्कर्षाप्रत विशेष न्यायालय आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.
तपास पूर्ण केल्यानंतर दोषारोपपत्र बुलडाणा येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. तक्रार दाखल केल्यानंतर पीडित बालकाला 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे पीडीतची आई, 5 वर्षीय पिडीत बालक, वैद्यकीय अधिकारी डॉ. शालीकराम निकाळे, डॉ. स्वाती गजानन गोलांडे व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनायक रामोड यांची साक्ष विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. या सर्व साक्षीदारांचे साक्षी व पुरावे घटनेला पुरक व एकमेकांशी सुसंगत असल्याने आरोपीने अत्याचार केल्याच्या निष्कर्षाप्रत विशेष न्यायालय आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. याप्रकरणात त्यांना पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर कांबळे यांनी सहकार्य केले, असे विशेष सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता यांनी सांगितले.