महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अश्लिल चित्रफित दाखवून अल्पवयीन मुलीची छेड; आरोपी अटकेत - minor girl Harassment news

अल्पवयीन मुलीला मोबाईलमधील अश्लिल चित्रफित दाखवून, त्या मुलीची छेडछाड केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुलडाणा शहरापासून जवळच असलेल्या पाडळी येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

21 years young boy arrested for Harassment a minor girl in buldhana
अश्लिल चित्रफित दाखवून अल्पवयीन मुलीची छेडखानी; आरोपी अटकेत

By

Published : Oct 20, 2020, 7:01 AM IST

बुलडाणा - अल्पवयीन मुलीला मोबाईलमधील अश्लिल चित्रफित दाखवून, त्या मुलीची छेडछाड केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुलडाणा शहरापासून जवळच असलेल्या पाडळी येथे घडली आहे. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी 21 वर्षीय तरूणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी गावातील राजू महाले या तरूणाने एका अल्पवयीन मुलीला घरामागे नेऊन मोबाईलमधील अश्लिल चित्रफीत दाखवून त्या मुलीची छेडछाड केली. याबाबत मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटूंबियांना सांगितला. तेव्हा कुटूंबियांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी राजू महाले यास अटक केली. आरोपीविरुद्ध कलम ३५४ सह पोस्को कलम ११, १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details