महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यातून उत्तर प्रदेशचे २०२ परप्रांतीय घराकडे रवाना.. - बुलडाणा परप्रांतीय न्यूज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडले आहेत. बुलडाण्यात २ महिन्यांपासून अडकलेल्या मजूरवर्गापैकी उत्तर प्रदेशाच्या २०२  मजुरांना आज (बुधवार) त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले.

202 migrant laborers  go to uttar pardesh from buldhana
बुलडाण्यातून उत्तर प्रदेशचे २०२ परप्रांतीय घराकडे रवाना..

By

Published : May 20, 2020, 7:37 PM IST

बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडले आहेत. बुलडाण्यात २ महिन्यांपासून अडकलेल्या मजूर वर्गापैकी उत्तर प्रदेशाच्या २०२ मजुरांना आज (बुधवार) त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले. बुलडाणा आगारातून १० एसटी बसने त्यांना अमरावतीत सोडण्यात आले. अमरावती येथून रात्री त्यांना उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परप्रांतीय मजूर
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, अडकून पडलेल्या कामगारांना मुळ गावी परतण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ५०० परप्रांतीय अडकून आहेत. सगळ्या परप्रांतीयांची तहसिल कार्यलयात रितसर अर्ज नोंदणी केली गेली आहे. मात्र, उपलब्ध ट्रेननुसार, या परप्रांतीयांना त्याच्या मूळगावी सोडण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशची रेल्वे आज असल्याने बुलडाणा तालुक्यातील एकूण २०२ जणांना रवाना करण्यात आले. त्यांना बुलडाणा आगाराच्या १० बसेसने अमरावती येथे सोडण्यात आले. तेथून ते उत्तर प्रदेशला जाणार आहेत. यावेळी बुलडाणा तहसीलदार संतोष लोखंडे, बुलडाणा आगार व्यवस्थापक साहेबराव मोरे, स्थानक प्रमुख साळवे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
बुलडाण्यातून उत्तर प्रदेशचे २०२ परप्रांतीय घराकडे रवाना..

ABOUT THE AUTHOR

...view details