बुलडाणा - कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मुलांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. परंतु, अलीकडेच कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील 2 शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. याला कोरोना जबाबदार नसून एक वाघ आहे. त्याच्या दहशतीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
माहिती देतान प्राचार्य आणि शिक्षक हेही वाचा -कृषी कायदे आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटींची मदत द्या; प्रविण तोगडियांची मागणी
परिसरात वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता
शनिवारी, 4 डिसेंबरच्या पहाटे सकाळी 4 वाजून 27 मिनिटांनी खामगावातील केशव नगर भागाच्या परिसरात वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओतील प्राणी वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर शहरात त्याची दहशत पसरली आहे. 7 डिसेंबर रोजी गायीच्या वासराला ठार केल्याचे समोर आले. हा हल्ला वाघाने केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी केली होती. या घटनेने शहरातील दहशतीत भर घातली होती.
गेल्या शनिवारपासून वन विभागाच्या अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलाडाणा अशी चार पथके या वाघाचा शोध घेत असून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. शिवाय शहर व परिसरात हा वाघ काहींना दिसला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने वाघाचा वावर असलेल्या भागाती फरशी नाला परिसरातील श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमती सुरजदेवी मोहता महिला महाविद्यालय व लॉयन्स ज्ञानपीठ या खासगी अनुदानित शाळांनी जो पर्यंत वाघ जेरबंद होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -Malkapur urban bank : मलकापूर बाजार समिती बंद ठेवण्याचा घेतला निर्णय